
नाशिक : नाशिककरांनी मंगळवारी (ता. ३१) मध्यरात्री मावळत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे जल्लोष करीत दणक्यात स्वागत केले. शहरासह जिल्ह्यात नववर्षाच्या पहाटेपर्यंत संगीत-रंगीत पार्ट्यांची रंगत वाढली होती. दुसरीकडे सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यसेवनासह नियम मोडणाऱ्यांचा पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त केला. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ‘स्टॉप ॲन्ड सर्चिंग’ या मोहिमेमुळे तळीराम पोलिसांच्या सापळ्यात अडकले.