Nashik Bribery Case
sakal
नाशिक: फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयिताला अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोन पोलिस उपनिरीक्षकांसह शासकीय विश्रामगृहाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.