नाशिक : पोलिस शिपायाच्या अंत्ययात्रेत आयुक्तांनी दिला खांदा

nashik colice commissioner participated in the funeral procession of the police constable
nashik colice commissioner participated in the funeral procession of the police constableSakal


नाशिक : आडगाव परिसरातील पोलिस शिपायाच्या निधनानंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी मृत शिपायाच्या अंत्ययात्रेला खांदा दिला. या प्रसंगी शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शहरातील पोलिसप्रमुखांची माणुसकी अनुभवली. गुरुवारी (ता. १६) आडगाव भागातील प्रतीक विलास जाधव (वय ३१) या तरुण शिपायाचे निधन झाले.

शहरातील दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असलेल्या प्रतीक जाधव यांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करीत त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्ययात्रेत मृत जाधव यांचे नातेवाईक सागर वाल्मीक जाधव यांच्यासह स्वतः पोलिस आयुक्तांनी भाग घेत खांदाही दिला. कमी वयात निधन झाल्याने पोलिसांत हळहळ व्यक्त होत होती.

nashik colice commissioner participated in the funeral procession of the police constable
डेंगीने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com