

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘सुरक्षित नाशिक’ साठी सिटी सेंटर मॉल येथे ‘सीसीटीव्ही एक्स्पो’चे उद्या (ता.२४) उद्घाटन होणार आहे. सीसीटीव्ही एक्स्पो येत्या शुक्रवारपासून (ता.२४) रविवारपर्यंत (ता. २६) असून या नामांकित सीसीटीव्ही कंपन्या सहभागी होणार आहेत.