नाशिक- शहर पोलिस आयुक्तालयात सध्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. टप्प्या-टप्प्याने होत असल्याने बदल्यांच्या आदेश मात्र आयुक्तालयात चर्चेचा विषय ठरतो आहे. सोयीनुसार बदल्या करणे ही बाब नित्याची असली तरी काही पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा निर्धारित कालावधी ठरूनही त्यांची बदली करण्यात आलेली नाही. अशा काही अंमलदारांच्या बदल्यांनी अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या असून, पोलिस वर्तुळात वेगळीच चर्चा होत आहे.