नाशिक : ...अन् चिमुरडा मातेच्या कुशीत सुखरूप परतला

Police
Policeesakal

म्हसरूळ (नाशिक) : वडापाव खाऊ घालतो, असे सांगत मुलास घेऊन फरार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळत पंचवटी पोलिसांनी या अपहृत चिमुरड्याला त्याच्या भिक्षेकरी मातेच्या कुशीत सुखरूप परत केले आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत अवघ्या १२ तासांत या घटनेचा छडा लावला आहे. राजू ऊर्फ रतन बबन वाघ (३८, रा. जऊळके, ता. दिंडोरी), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

शनिवारी (ता. १) सकाळी रामकुंड भागातून शीतल शिरसाट यांच्या पतीच्या ओळखीचे राजू वाघ हा ६ वर्षीय दीपकला वडापाव खाऊ घालून आणतो, असे सांगत घेऊन गेला. त्यानंतर तो परत आला नाही. याप्रकरणी शीतल शिरसाट यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी लागलीच तपास केला. वर्णनानुसार पोलिसांनी जवळपास ३०० संशयित व्यक्तीची चौकशी केली. दरम्यान, संशयित रविवार कारंजा, दूधबाजार परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांना संशयित व्यक्ती मुलासह आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत त्याने मुलगा झोपल्याने त्यास त्याच्या आईजवळ आणले नसल्याचे संशयिताने सांगितले. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मधुकर गावित, निरीक्षक (गुन्हे) युवराज पत्की यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथकातील अंमलदार यांनी पार पाडली.

Police
आईनं जुळ्यांना दिला जन्म, पण दोन भिन्न वर्षात असणार वाढदिवस

कामगिरीचे कौतुक

अनेकदा पोलिसांवर 'ते फक्त ज्याचा वशिला आहे, अशांची अन् राजकीय नेते व बड्या लोकांचीच कामे करतात, असे आरोप होत असतात. परंतु, एका भिक्षेकऱ्याच्या अपहृत मुलाला शोधण्यासाठी पोलिसांनी कौशल्य पणाला लावले. त्यासाठी जवळपास ३०० व्यक्तींकडे चौकशी केली आणि बारा तासांतच अपहृत मुलाचा शोध लावला व संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांसाठी सर्वच जण सारखेच असल्याचे या कामगिरीतून पंचवटी पोलिसांनी सुखावून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Police
सावत्र आई असली म्हणून काय झालं? अर्जुन झाला भावूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com