नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर लाखोंचा सट्टा; दोन बुकी गजाआड

Arrested
ArrestedSakal
Updated on

नाशिक : दुबईत सुरु असलेल्या टी २० क्रिकेट वर्ल्डकपच्या सामन्यांवर सट्टा लावणारे दोघे शहर पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून ५ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.

क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यांवर सट्टा सुरु असल्याची हवालदर देवकिसन गायकर यांना माहीती मिळाल्यावरुन पोलिस उपायुक्त संजय बारकुंड सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला आणि नाशिक रोडला उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गाव परिसरात, सुराणा हॉस्पीटल जवळ वसीम रशीद शेख याला ॲक्टिव्हा स्कूटर (एमएच ०४ झेड डब्लू ५९४९) वर अटक केली. हा दुचाकीवर बसून क्रिकेट वर्ल्ड कप मधील साखळी सामान्यात श्रीलंका विरुध्द दक्षिण आफ्रीका यांच्यातील क्रिकेट सामन्यांवर मोबाईल ॲपवर धावा आणि विकेट पाहून त्या आधारे सट्टा चालवित असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करणयात आली.

Arrested
तुषार भोसलेविरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत तक्रार

पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे, उपनिरीक्षक विजय लोंढे, शामराव भोसले, देवकिसन गायकर, शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुगन साबरे, गुलाब सोनार, सुनील आहेर, यादव डंबाळे, प्रकाश बोडके आदीनी देवळालीगावात गाडेकर मळ्यातील हरिश्रध्दा सोसायटीतील वसीम शेख (वय४०) आणि अमोल शिवाजी नागरे (वय ३२,दत्तनगर पंचवटी) यांना साफळा लावून पकडले. त्यांची चौकशी केली असता, विजय नंदवाणी याच्या सांगण्यावरुन कमिशनवर बेटींग घेत असल्याचे चौकशीत संशयितांनी पोलिसांना सांगितले. क्रिकेट लाईन गुरु ॲपवर स्कोर पाहून बेटींग पैसे स्विकारुन
सट्टा चालवित असल्याचे लक्षात आले. ३ लाख ४८ हजरा रोख २ मोबाईल, २ मोपेड वाहनांसह नोंदवही ५ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

Arrested
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना 120 कोटीची मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com