देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांना आदरांजली

देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांना आदरांजली
Published on: 
फोटो : 33162 नाशिक : कवायत मैदानावर पोलिस स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे आदी. -- देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांना मानवंदना शहर पोलिस आयुक्तालयातर्फे कवायत मैदानावर स्मृतिदिन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : शहर पोलिस आयुक्तालयातर्फे बुधवारी (ता. २१) कवायत मैदानावर पोलिस स्मृतिदिनानिमित्त कर्तव्य बजावताना देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहिदांचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी २०२५-२०२६ या कालावधीत हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून त्यांना मानवंदना देण्यात आली. श्रद्धांजली सोहळ्यास नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि सर्व उपायुक्त प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय, शहीद पोलिस अधिकारी व अंमलदारांचे कुटुंबीयदेखील उपस्थित राहून आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी मान्यवरांनी वीरमरण प्राप्त झालेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या अतुलनीय शौर्याचे, त्यागाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे स्मरण केले. समाजातील शांतता टिकवण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबांप्रति या वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहिदांच्या या सर्वोच्च बलिदानाची जाणीव ठेवून देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा दृढ संकल्प पोलीस दलातर्फे या वेळी अधोरेखित करण्यात आला. शहीद पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या शौर्यगाथा भविष्यातही अधिकारी, अंमलदार यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाला कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि देशसेवेची प्रेरणा देत राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्या वतीने शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आणि शस्त्रे खाली नमवून मानवंदना देऊन झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com