Nashik Police : नो-पार्किंगमधील वाहने पोलिसांच्या रडारवर! एका दिवसात दोनशेवर केसेस; दंडही वसूल

Nashik News : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोईंग बंद असल्याने चारचाकी वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केली जाते.
Police officials of the traffic branch levying fines through e-challan on vehicles parked in no-parking areas in the city.
Police officials of the traffic branch levying fines through e-challan on vehicles parked in no-parking areas in the city.esakal

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोईंग बंद असल्याने चारचाकी वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत असल्याने अखेर शहर वाहतूक शाखेने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या नो-पार्किंगमधील वाहनांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पहिल्याच दिवशी १९७ केसेस करीत सुमारे एक लाखांचा दंडही आकारला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे मात्र धाबे दणाणले आहे. असे असले तरी दुसरीकडे काही रस्त्यांवर अजूनही सर्रासपणे नो-पार्किंगमध्ये वाहने पार्क केली जात असून त्याकडे मात्र डोळेझाक होते आहे. (Nashik Police No parking vehicles on police radar over two hundred cases in day Fines collected marathi news)

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोईंग ठेका देण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. बेशिस्त वाहनाचालक आपल्या चारचाकी, दुचाकी वाहने कोठेही रस्त्यालगत पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या उद्‌भवते. परिणामी सर्वसामान्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तसेच, सातत्याने अपघातांचे प्रकारही वाढत आहेत. अपघाती मृत्यु व जखमींचे प्रमाणही वाढते आहे.

यासंदर्भात शहर वाहतूक शाखेच्या आयुक्तालय हद्दीतील चारही विभागात बेशिस्त वाहनांसह नो-पार्किंगमधील वाहनांविरोधात धडक दंडात्मका कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी चारही विभागात केलेल्या कारवाईतून नो-पार्किंगच्या १९७ केसेस दाखल करीत ९८ हजार ५०० रुपयांचा दंड इ-चलानद्वारे आकारला आहे. या कारवाईमुळे नो-पार्किंगमध्ये वाहने पार्क करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

याठिकाणी झाली कारवाई

- त्र्यंबक नाका ते मेहेर सिग्नल स्मार्ट रोड

- होळकर पुल

- शरणपूर रोड

- मुंबई नाका ते द्वारका

- बिटको चौक

- जेलरोड

- कॉलेजरोड

- गंगापूर रोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com