Collector Jalaj Sharma, Commissioner of Police Sandeep Karnik, Smt Navresham Kaur Grewal at the unveiling of 'GPS - Safer Nashik' app
Collector Jalaj Sharma, Commissioner of Police Sandeep Karnik, Smt Navresham Kaur Grewal at the unveiling of 'GPS - Safer Nashik' appesakal

Nashik Police : नाशिक पोलिसांची GPS द्वारे शहरात पेट्रोलिंग! ‘ग्राऊंड प्रेझेन्ट सिस्टिम - सुरक्षित नाशिक’ ॲपचे अनावरण

Nashik News : आता नाशिक शहर पोलिसांनी कात टाकत आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शहर पोलिस ‘जीपीएस-पेट्रोलिंग’ करणार आहेत.

Nashik Police : शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पारंपरिक पद्धतीने गस्ती असतेच. परंतु आता नाशिक शहर पोलिसांनी कात टाकत आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शहर पोलिस ‘जीपीएस-पेट्रोलिंग’ करणार आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘ग्राऊंड प्रेझेन्ट सिस्टिम - सुरक्षित नाशिक’ या ॲपचे अनावरण मंगळवारी (ता. २) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. (Nashik Unveiling of Ground Present System Safe Nashik app marathi news)

पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात आयोजित ॲप अनावरणप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, श्रीमती नवरेशम कौर ग्रेवाल, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, प्रभारी पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या ॲपच्या नोडल अधिकारी गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे होत्या. यानंतर उपस्थित प्रभारी अधिकारी व अंमलदारांना सदरील ॲपसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

असे होणार मॅपिंग

पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांसह ठाण्यातील अधिकारी-अंमलदारांच्या मोबाईलमध्ये ॲप पुरविण्यात आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वसाधारण ठिकाणे, प्राधान्यक्रमांची ठिकाणे, निवडणूकसंबंधित ठिकाणे, नागरिक केंद्रीत ठिकाणे असे चार गटात विभागणी केली आहे.

गुगल मॅपींगद्वारे निश्चित केलेल्या ठिकाणी अंमलदाराने पोहोचून भेट देत फोटो काढणार. तो फोटो प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांस ऑनलाईन दिसणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ठिकाणी अंमलदाराचे लोकेशन कळू शकणार आहे. लोकेशनला भेट देण्यापूर्वी मॅपवरील ग्रे रंग, भेट दिल्यानंतर ग्रीन होणार आहे. (latest marathi news)

Collector Jalaj Sharma, Commissioner of Police Sandeep Karnik, Smt Navresham Kaur Grewal at the unveiling of 'GPS - Safer Nashik' app
Nashik Police: ‘नेत्यां’च्या संपर्कातील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर! आयुक्तालयाकडून पोलिस ठाणेनिहाय संबंधितांची यादी तयार

९०० ठिकाणं, ८३४ अंमलदार

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणारे पोलीस उपायुकत, सहायक आयुक्त, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गस्ती पथके आणि बीट मार्शल्स असे सुमारे ८३४ अधिकारी-अंमलदारांना ‘जीपीएस-सुरक्षित नाशिक’ ॲपचा ॲक्सेस असणार आहे. आजमितीस पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुमारे ९०० ठिकाणांची मॅपिंग निश्चित करण्यात आलेली आहेत.

अशी आहेत ठिकाणं

सर्वसाधारण ठिकाणं : शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, भाजी मार्केट, गर्दींची ठिकाणे

प्राधान्यक्रमांची ठिकाणं : पुतळे, मंदिर, मस्जिद व धार्मिक स्थळे

निवडणूक ठिकाणं : मतदान केंद्र, मतमोजणी, अतिसंवेदनशील ठिकाणे

नागरिक केंद्रीत : नागरिकांनी सूचित केलेली ठिकाणे

"अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे पोलिसिंग करण्याचा प्रयत्न आहे. जीपीएस - सुरक्षित नाशिक ॲपमुळे पेट्रोलिंगवरील अधिकारी-अंमलदारांचा शहरातील पोलीस प्रेझेन्स दिसणार आहे. यासाठी सुमारे आठशेपेक्षा अधिक स्पॉट निश्चित केली असून, त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे."- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

"शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा आत्मविश्वास वाढत असतो. या ॲपमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलिसांना पेलणे शक्य होणार आहे."

- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

Collector Jalaj Sharma, Commissioner of Police Sandeep Karnik, Smt Navresham Kaur Grewal at the unveiling of 'GPS - Safer Nashik' app
Nashik Police : गावठी कट्टा दिसल्यास पोलिसांना संपर्काचे आवाहन! नाशिक रोड अन उपनगर पोलिस स्टेशनची मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com