Vehicles in accidents.
Vehicles in accidents. esakal

Nashik Accident News : सभेचा बंदोबस्त आटोपून परतणाऱ्या काका-पुतण्याचा भीषण अपघात

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून रात्री उशिरा पुतण्यासोबत घरी जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जेल रोड येथे भीषण अपघात झाला
Published on

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून रात्री उशिरा पुतण्यासोबत घरी जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जेल रोड येथे भीषण अपघात झाला असून, त्यात पुतण्याचा जागीच मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Nashik Accident News)

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकासमोर मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री तीनच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या सिटी होंडा कारची दुचाकी गाडीचालकास धडक बसल्याने हा अपघातात झाला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी स्वप्नील गायकवाड (३८) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगर येथे आयोजित सभा बंदोबस्तकरीता रवाना झाले होते. बंदोबस्त आटोपून ते नगर येथून नाशिककडे निघाले. रात्री उशिरा ते बिटको चौकात आले असता त्यांना एकही प्रवासी वाहन भेटत नव्हते.

म्हणून खर्जूल मळा, सिन्नर फाटा येथील मोहन बाळू गायकवाड (वय ३६) या पुतण्या दुचाकी घेऊन बिटको चौकात बोलावले. दोघे काका पुतणे आपल्या दुचाकीवरून (एमएच- १५- डीजे- ८७७८) काका स्वप्नील गायकवाड यांना घेऊन त्यांच्या प्रभात सोसायटी, मॉडेल कॉलनी जेलरोड येथे जात होते. (latest marathi news)

Vehicles in accidents.
Nashik News : कोट्यवधींचे बसस्थानक धूळखात; बस येत नसल्याने प्रवाशांचे हाल

नांदूर नाक्याकडे भरधाव जाणाऱ्या सिटी होंडा कारने (एमएच- ०१- एएक्स- ३७६०) जोरदार धडक दिली. यात मोहन बाळू गायकवाड, स्वप्नील दीपक गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता पुतण्या मोहन गायकवाड यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

तर पोलिस काका स्वप्नील गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजतात वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी सहाय्यक निरीक्षक काळे हे अपघातस्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी नितीन बाळू गायकवाड (रा. खर्जुल मळा, सिन्नर फाटा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे हे करत आहे.

Vehicles in accidents.
Nashik News : तिकीट आरक्षित करूनही कुचंबणा; रेल्वेगाड्यांत आरक्षण केलेल्या प्रवाशांची धावपळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com