

नाशिक : ट्रिपलसीट दुचाकी चालवून वाहतूक अंमलदारांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणार्या आरोपीला न्यायधीश उठेपर्यंत न्यायालयात हजर राहण्याची शिक्षा ठोठावली. सुरेश सुखदेव झनकर (रा. रामराज अपार्टमेंट, रामकृष्णनगर, अंबड लिंकरोड) असे आरोपीचे नाव आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी फाटा येथे अंमलदार गजानन सतीश पाटील हे २७ मार्च २०१४ रोजी कर्तव्यावर होते.