Nashik Police Recruitment Written Test : पोलीस भरतीची आज लेखी परीक्षा! शहराची KTHM तर ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

Police Recruitment Written Test : नाशिक शहर आयुक्तालयातील रिक्त ११८ आणि ग्रामीण पोलिस दलातील ३२ रिक्त जागांसाठी रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा होते आहे.
Police Recruitment Written Test
Police Recruitment Written Testesakal

Nashik Police Recruitment Written Test : जून अखेरिस पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी आटोपल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रतिक्षा होती. त्यानुसार, मुंबई वगळता राज्यात रविवारी (ता. ७) पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात तर, नाशिक ग्रामीणतर्फे आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी (मेट) येथे ही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. (Nashik Police Recruitment Written Test Today)

नाशिक शहर आयुक्तालयातील रिक्त ११८ आणि ग्रामीण पोलिस दलातील ३२ रिक्त जागांसाठी रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा होते आहे. शहर पोलिस प्रशासनाकडून लेखी परीक्षा गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात तर ग्रामीण पोलिसांकडून आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत होणार आहे.

या परीक्षेसाठी पोलीस प्रशासनाने परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना सकाळी सात ते नऊ या वेळेतच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे सूचित केले आहे. परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून दीड तासांची ही लेखी परीक्षा आहे. परीक्षेला येताना उमेदवारांनी मैदानी चाचणीवेळी दिलेले ओळखपत्र, चेस्ट क्रमांक सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अंमलदारांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

हरकतींनंतर निकाल

लेखी परीक्षा घेण्यात आल्यानंतर दोन दिवसांत उत्तर पत्रिका जाहीर केली जाईल. त्यानंतर, गुणतालिकाही जाहीर होईल. यावरील हरकतीं आल्यानंतर त्या निकाली काढण्यात येतील. त्यानंतर अंतिम गुणतालिका व निकाल जाहीर होईल. यातून निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांचा पोलीस प्रशिक्षणासाठी रवाना केले जाणार आहे. (latest marathi news)

Police Recruitment Written Test
Sharad Pawar: विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी शिवनगर संस्था ठरतेय यशस्वी; शरद पवारांचे प्रतिपादन

दीड हजार परीक्षार्थी

शहर पोलिस आयुक्तालयातील ११८ रिक्त जागांसाठी ४ हजार ३७४ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले होते. कटऑफनुसार यातून लेखी परीक्षेसाठी १ हजार १९७ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणमध्ये ३२ रिक्त जागांसाठी १ हजार ८१८ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले. तर कटऑफनुसार, यातून ३१६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. अशारितीने १ हजार ५१३ उमेदवार हे पोलीस शिपाई पदासाठी रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा देणार आहेत.

मोबाईल, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मनाई

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच, व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. उमेदवारांना पोलीस प्रशासनाकडूनच पॅड व काळा पेन दिला जाईल. उमेदवारांनी सोबत ओळखपत्र, चेस्ट क्रमांक, प्रवेश पत्र व तीन पासपोर्ट साईजचे फोटो आणावेत. परीक्षा केंद्रात मोबाईल, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक्ससह कोणतीही वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रासाठी www.policerecruitment2024.mahait.org या वेबसाइटवर जावे. 

Police Recruitment Written Test
Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com