इंदिरानगर- नाशिक शहरातील इंदिरानगर परिसर, उपनगरे आणि इगतपुरी तालुक्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी त्यांची विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. या वेळी पोलिसांनी या संशयित दुचाकी चोरांकडून चोरीच्या दुचाकी ज्यांना विकल्या अशा सुमारे १० लाख २० हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त केल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली.