Nashik Crime News : न्यायालयीन कामकाजात कैदींच्या सोबत ओली पार्टी करणाऱ्या पोलिसांना बडतर्फी!
Police Officers Suspended for Misconduct During Jail Escort : नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कैदी पार्टीतील तिघा पोलिस अंमलदारांना बडतर्फीचा आदेश दिला, न्यायालयीन कामकाजात झालेल्या अनुशासनभंगामुळे.
नाशिक- खुनाच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना न्यायालयीन कामकाजानंतर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात नेताना वाटेत हॉटेलमध्ये मटणावर ताव मारत ओली पार्टी करणाऱ्या कैदी पार्टीतील तीन पोलिस अंमलदारांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले.