Nashik Police Transfer : डॉ. शेखर-पाटील यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून ते उपनिरीक्षकांपर्यंतच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे.
IG B.G. Shekhar Patil
IG B.G. Shekhar Patilesakal

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून ते उपनिरीक्षकांपर्यंतच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे.

यामध्ये डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची पुणे मोटार वाहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. डॉ. शेखर-पाटील यांची येत्या मे महिन्यात सेवानिवृत्ती असल्याने त्यांनी या बदलीविरोधात मॅटमध्ये याचिका दाखल केली आहे.

त्यावर येत्या सोमवारी (ता.१२) सुनावणी होणार आहे. दरम्यान, दत्ता कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार गेल्या आठवड्यातच स्वीकारला आहे. (Nashik Police Transfer Hearing on Dr Shekhar Patil plea on Monday)

गेल्या आठवड्यामध्ये अपर महासंचालकांपासून ते विशेष पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, अधीक्षकांच्या बदल्या गृहविभागाने केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील बहुतांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

यामध्ये ठाण्याचे सहआयुक्त दत्ता कराळे यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी तर, डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची पुण्यात पोलीस मोटार वाहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.

IG B.G. Shekhar Patil
Police Sports Competitions: पुणे-चिंचवड, अमरावती, नागपूरची विजय सलामी! 34 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांना थाटात प्रारंभ

दरम्यान, डॉ. शेखर -पाटील हे येत्या मे महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. याच मुद्यावर डॉ. शेखर-पाटील यांनी मॅटमध्ये धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या १२ तारखेला सुनावणी होणार असून, बदलीला स्थगिती मिळते का, याकडे आता लक्ष आहे.

एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी घेतली होती. या दरम्यान त्यांनी अंमलीपदार्थविरोधात दमदार काम केले.

IG B.G. Shekhar Patil
ZP President Cup Competition: जीवनातील प्रत्येक स्पर्धेत टिकण्यास सक्षम व्हा : आशिमा मित्तल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com