

Nashik Police Turf League Cricket : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह खासगी संस्था आणि आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी ‘नाशिक पोलीस टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १८) दुपारी ३ वाजता होणार असू, स्पर्धा आसाराम बापू पुलाजवळील विश्वास टर्फ मैदान येथे होत आहेत. (Police Turf League Cricket Tournament)