Nashik NCP Political: नाशिक लोकसभा मतदार संघावर अजित पवार गटाचा दावा! आमदार कोकाटे यांना तिकीट द्यावे अशी मागणी

येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत असून ते लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ वाढवतील.
Nashik Political Ajit Pawars claim on Nashik Lok Sabha Constituency Demand to give ticket to MLA Kokate
Nashik Political Ajit Pawars claim on Nashik Lok Sabha Constituency Demand to give ticket to MLA Kokateesakal

सिन्नर : येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत असून ते लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ वाढवतील. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे महायुतीचे समीकरण लोकसभेच्या निवडणुकीत असणार आहे.

लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा वाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नसताना नाशिक मधून मात्र अजित पवार गटाने मात्र तयारी सुरू केली आहे.

सिन्नर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या साक्षीने कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आग्रह धरल्याचे बघायला मिळाले. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छोटासा मेळावा पार पडला.

लोकसभा निवडणुकी संदर्भात देखील यावेळी चर्चा झाली. महायुतीतील प्रमुख पक्षांचे नेते जागा वाटपाबाबत निर्णय घेतील आणि त्यानंतरच नाशिकमधील उमेदवारी बाबत चर्चा करणे उचित राहील असे श्री म्हैसधुणे, आमदार कोकाटे यांनी सांगितले. मात्र पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपात नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे ठेवावी असा आग्रह धरला.

सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आमदार कोकाटे यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तबच करून टाकले. पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभेसाठी उमेदवारी करायला तयार आहोत असे यापूर्वी देखील आमदार कोकाटे यांनी सांगितले आहे. हाच धागा पकडून कार्यकर्त्यांनी उमेदवारीचा लावल्याचे यावेळी बघायला मिळाले.

Nashik Political Ajit Pawars claim on Nashik Lok Sabha Constituency Demand to give ticket to MLA Kokate
Kiran Mane in Politics: अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; बोलताना म्हणाले, "राजकारण गढूळ..."

लोकसभेबाबत राष्ट्रवादीकडून पडण्याची तयारी असली तरी निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. सद्यस्थितीत हेमंत गोडसे यांच्या रूपाने शिंदे गटाकडे खासदारकी आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. तर राष्ट्रवादीकडून देखील नाशिकच्या जागेसाठी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे जागावाटपाचा अंतिम झाल्यानंतरच मतदारांकडे कोणाचा कौल मागायचा हे ठरणार आहे.

सध्या तरी शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे हॅट्रिक साठी प्रयत्न करतील तर राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांचे नाव तुल्यबळ उमेदवार म्हणून पुढे येईल अशी चर्चा आहे. भाजपकडून देखील यावेळी तगडा उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली जात आहे. याही निवडणुकीत मोदी फॅक्टर चालणार हे निश्चित असल्याने भाजपची नाशिकसाठी धडपड सुरू आहे.

लोकसभेसाठी भाजपने जागा वाटपात नाशिकची जागा पदरात पाडून घेतली तर शहरी भागातील मतांचा फायदा मिळेल मात्र ग्रामीण भागातील मतदार भाजपला किती आपलेसे करतील हा प्रश्न असेल. या उलट राष्ट्रवादीकडून उमेदवार दिल्यास भाजपच्या शहरी मतांसोबतच ग्रामीण भागातील मध्ये देखील जोडली जातील व त्याचा फायदा महायुतीतील जागा वाढण्यात होईल याकडे सिन्नरच्या मेळाव्यात खुद्द जिल्हाध्यक्षांनीच लक्ष वेधल्याचे बघायला मिळाले.

Nashik Political Ajit Pawars claim on Nashik Lok Sabha Constituency Demand to give ticket to MLA Kokate
NCP Political Crisis: राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी घडामोडींना वेग; दोन्ही गटाला कागदपत्र, पुरावे सादर करण्यासाठी दिली तारीख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com