Nashik Political: मनसेंच्या प्रकल्पांना भाजपचा ‘मेकओव्हर’! ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत रिलायन्स, गोदा पार्कचे पुनर्निर्माण

Political News : या माध्यमातून नाशिकमध्ये भाजप व मनसेची युती घट्ट होण्याचे संकेत मिळत आहे.
BJP & MNS
BJP & MNSesakal

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेत युतीचे शासन असताना साकारलेला गोदापार्क व मनसेची सत्ता असताना पन्नास कोटी खर्च करून साकारलेला रिलायन्स पार्कचे ‘नमामि गोदा’ प्रकल्प अंतर्गत पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्कचे पुनर्जीवन करताना पर्यावरणाचे नियम पाळून ग्रीन बेल्ट संकल्पना राबविली जाणार आहे. या माध्यमातून नाशिकमध्ये भाजप व मनसेची युती घट्ट होण्याचे संकेत मिळत आहे. (Nashik Political BJP makeover to MNS projects Reconstruction of Reliance Goda Park under Namami Goda project marathi news)

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यापासून राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे. शाखा उद्‌घाटनांच्या निमित्ताने कायम नाशिकला येणे-जाणे होते. त्यामुळे नाशिकमधील युवकांचा ते गळ्यातील ताईत होते. २००२ मध्ये महापालिकेत भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आल्यानंतर नाशिकचे चित्र बदलण्याची जबाबदारी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.

शहराचा विकास करताना त्या वेळी राज ठाकरे यांनी नाशिककरांना नैसर्गिक सानिध्यात फिरण्यासाठी व गोदाकाठचा सुनियोजित विकास होण्यासाठी गोदा पार्क ही संकल्पना अमलात आणली. महापालिकेने त्या वेळी जवळपास पंचवीस कोटी रुपये खर्च करून गोदापार्क साकारला.

परंतु कालांतराने देखभाल- दुरुस्तीअभावी पार्कची दुरवस्था झाली. कालांतराने गोदा पार्क प्रेमीयुगल व दारूड्यांचा अड्डा बनला. काही ठिकाणी भूसंपादनाला विरोध झाला. २०१२ च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात गोदापार्कचे पुनर्जीवन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. (Latest Marathi News)

BJP & MNS
Nashik News : हेल्मेट, सीटबेल्टचा नियमित वापर करा : अशोक मुर्तडक

सत्ता आल्यानंतर ठाकरे यांनी गोदापार्क बरोबरच रिलायन्स ग्रुपच्या सामाजिक दायित्व निधीतून पन्नास कोटी रुपये खर्च करून बापू पुलाच्या दोन्ही बाजूला घाट विकसित केला. मात्र गोदावरीला आलेल्या पहिल्या पुरातच रिलायन्स पार्क पाण्यात वाहून गेला. मनसेची सत्ता गेल्यानंतर रिलायन्स व गोदा पार्क जैसे-थे स्थितीत आहे.

दोन्ही प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च करण्यात आले, परंतु पुरेसा वापर झाला नाही. नमामि गोदा प्रकल्प साकारताना नदी सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या सौंदर्यीकरणात गोदापार्क व रिलायन्स पार्कची जागा येत असल्याने या दोन्ही प्रकल्पांचे नमामि गोदा प्रकल्पांतर्गत पुनर्निर्माण केले जाणार आहे. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने केंद्रातील सत्ताकाळात मेकओव्हर होणार आहे.

पार्कच्या जागेवर ग्रीन बेल्ट

नमामि गोदाचा नुकताच बेस मॅप महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. त्यात गोदापार्क व रिलायन्स पार्क पुनर्निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार नदीपात्रात बांधकामविषयक काम करता येणार नाही.

त्यामुळे पर्यावरणाचे सर्व नियम पाडून गोदा पार्क परिसरात ग्रीन बेल्ट तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर रिलायन्स प्रकल्पाची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली आहे. येथेदेखील ग्रीन बेल्ट केला जाणार आहे.

BJP & MNS
Nashik News : येवल्यात 3 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; मंत्री भुजबळांचा पाठपुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com