नाशिक रोड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व आमदार सरोज आहिरे यांच्या पाठपुरव्यातून अल्पसंख्याक विभागाकडून शहरी भागासाठी २, तर ग्रामीण भागात १ कोटी अशी तीन कोटींची विकासकामे मंजूर झाली. (Nashik Political Deolali Constituency marathi news)
देवळालीगाव कब्रस्तान आनुषंगिक कामे ७० लाख, विहीतगाव कब्रस्तान आनुषंगिक कामे ५० लाख, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड ख्रिश्चन समाजासाठी चर्च सुधारणा व संरक्षण भिंत ३० लाख, कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील ख्रिश्चन समाजाचे कब्रस्तान परिसर सुधारणा २० लाख, चेहेडी येथील कब्रस्तान आनुषंगिक कामे व नूतनीकरण ३० लाख, असा दोन कोटींचा निधी मंजूर आहे.
लाखलगाव येथील कब्रस्तान संरक्षक भिंत १० लाख, लाखलगाव येथील कब्रस्तान आनुषंगिक कामे १० लाख, शिंदे येथील कब्रस्तान आनुषंगिक कामे १० लाख, शिंदे येथील कब्रस्तान संरक्षक भिंत १० लाख, सय्यद पिंपरी येथील अल्पसंख्याक वस्ती रस्ता १० लाख, अल्पसंख्याक वस्ती आनुषंगिक कामे १० लाख, जाखोरी येथील कब्रस्तान आनुषंगिक कामे १० लाख, जाखोरी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत १० लाख, ओढा येथील कब्रस्तान परिसर सुधारणा १० लाख, ओढा येथील कब्रस्तान आनुषंगिक कामे १० लाख असा एक कोटी रुपये असा मिळून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.