
Nashik Political News : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसांपासून काँग्रेसने उमेदवारासाठी सर्वे सुरू केला असून, माजी आमदार निर्मला गावित यांचा काँग्रेस पक्षप्रवेश निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जिल्ह्याचे संपर्क नेते बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वर व इगतपुरीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी (ता.१ ९) मुंबईत बोलविले आहे. (Nirmala Gavit Congress entry)