Nashik Politics
esakal
नाशिक : महापालिका निवडणुकीत (Nashik Politics) ‘पानिपत’ झाल्यावर उपरती सुचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील निवडणुकीत तरी पक्षाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा स्थानिक नेत्यांना आहे.