Nashik MSEB News : अधिकारी म्हणतात होईल करू बघू मात्र कुठलीही कारवाई नाहीच, वीज वितरणाचा भोंगळ कारभार

Latest Nashik News : बागलाण तालुक्यातील करंजाड येथे गेल्या अनेक वर्षापासून वीज वितरणचे उपकेंद्र सुरू केल्यापासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.
electricity distribution sub centre
electricity distribution sub centreesakal
Updated on

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील करंजाड येथे गेल्या अनेक वर्षापासून वीज वितरणचे उपकेंद्र सुरू केल्यापासून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. विजेच्या लपंडावामुळे परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. या वीज वितरण उपकेंद्रात अनेक सहाय्यक अभियंता आले आणि गेले निवेदनेही दिली. अधिकारी म्हणतात होईल, करू, बघू मात्र कुठलीही कारवाई आजतागयत झाली नसल्याचे वीज ग्राहक नागरिकांकडून बोलले जात आहे. (poor management of electricity distribution sub centre of baglan )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com