LPG Cylinder News: गॅस सिलिंडर 300 रुपयांना मिळणे शक्य! बायोमेट्रिक, बारकोड प्रणाली कार्यान्वितची मागणी

Nashik News : स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिक, ऑटो रिक्षा व एलपीजी गॅस वाहनांसाठी उघडपणे वापर होत असल्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत साडेआठशे ते नऊशे रुपयांपर्यंत पोचली आहे.
LPG Cylinder News
LPG Cylinder Newsesakal

नाशिक : स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिक, ऑटो रिक्षा व एलपीजी गॅस वाहनांसाठी उघडपणे वापर होत असल्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत साडेआठशे ते नऊशे रुपयांपर्यंत पोचली आहे. गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापरासाठी झाल्यास ३०० रुपयांपर्यंत दर कमी होतील. त्यासाठी शासनाने सिलिंडर वितरित करणाऱ्या कंपन्यांना बायोमेट्रिक व बारकोड प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्याची मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने केली आहे. (nashik gas cylinder in 300 rupees marathi news)

घरगुती गॅस सिलिंडर सतर्कता जनजागृती अभियानांतर्गत गॅस सिलिंडर वितरणाविषयी नितीन सोळंके, कृष्णा पवार, रोहित पवार, प्रशांत जमगडे यांनी गुरुवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत माहिती दिली. नितीन सोळंके म्हणाले, देशातील ७५ टक्के नागरिक गॅसचा घरगुती तर, २० टक्के लोक चुलीवर स्वयंपाक करतात.

केवळ ५ टक्के लोक विजेवर चालणाऱ्या इंडक्शन चुलीचा वापर करतात. चुलीचा वापर थांबवण्यासाठी गॅस हा सक्षम पर्याय असून, त्याची किंमत सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात येणे सहज शक्य आहे. गॅस सिलिंडर वितरित करणाऱ्या कंपन्या सर्रासपणे घरगुती गॅस व्यावसायिक वापरासाठी देतात.

नाशिक शहरातून साधारणतः ८०० हॉटेल्स, रिक्षा व एलपीजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांना दिला जातो. त्यातून शासनाचा पाच ते सहा कोटी रुपये जीएसटी बुडत आहे. एकट्या नाशिक शहराचा हा आकडा असून देशभरात कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सोळंके यांनी सांगितले.

गॅस वितरित करणाऱ्या कंपन्या व्यावसायिकांना अगदी सहजपणे घरगुती गॅस सिलिंडर विकतात. एखाद्या व्यक्तीला वर्षाला १२ सिलेंडरचा कोटा निश्‍चित केलेला असेल आणि त्यांनी फक्त पाच ते सात सिलिंडर वापरले तर उर्वरित कोटा वितरक विकतात. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सेटिंग केलेली असल्यामुळे त्याचा साधा मेसेजही येत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या लक्षात ही बाब येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.  (latest marathi news)

LPG Cylinder News
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर! १६ नावांची केली घोषणा; येथे पाहा यादी

या उपाययोजनांची आवश्‍यकता

-ग्राहकांच्या गॅस सिलिंडर चोरी रोखण्यासाठी बारकोड,

क्यूआर कोड आणि आरएफआयडी टॅग चिकटवणे आवश्‍यक

-विक्री, पॅकेज ट्रॅकिंगची सुविधा

-‘ट्रॅक ॲन्ड ट्रेस’साठी क्यूआर कोड अत्यावश्‍यक करावा

-धान्य वितरण प्रणालीप्रमाणे गॅस वितरण प्रणाली सुरु करा

देशात घरगुती गॅस सिलिंडरची वाढती विक्री

१९८०: ०.३१ कोटी

२००१: ५.७८ कोटी

२०२२: ३०.५३ कोटी

२०२३: ३१.४ कोटी

२०२३: ९.५८ कोटी (उज्ज्वला गॅस)

LPG Cylinder News
Nashik NMC News : शहर क्षयमुक्त करण्यासाठी ‘Adult BCG’ अभियान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com