जुने नाशिक: टपाल विभागाचे काम अधिक सुलभ होण्यासाठी नवीन एपीटी तंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवार (ता. २) कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. आठ दिवस उलटत असले तरी अद्याप योग्यरीत्या तंत्रप्रणाली कार्यरत न झाल्याने कार्यालयाचे काम ठप्प झाले आहे. मनीऑर्डर रूपात सामान्य कुटुंबीयांना मिळणारी आर्थिक मदत आणि भावांपर्यंत राखी पोचण्यासाठी अडचण आली आहे. त्यामुळे सणासुदीला विघ्न लागले, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या.