
नाशिक : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या रस्त्यावर आठ ते दहा फुट खोलीचे ड्रेनेज असून, त्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. लोखंडी कमकुवत असून वाहनांच्या रहदारीमुळे वाकली असून, एखादे अवजड वाहन त्यावरून गेल्या मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शहर वाहतूक पोलिस शाखेकडून ‘न्हाई’ (राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण) कडे पाठपुरावा केला असता, त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.