Nashik News : रस्त्यास पडलेले भगदाड ठरतेय मृत्यूचा सापळा; 15 दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

Nashik News : सराफ बाजारातील जंगम बाजार चौकात स्मार्टसिटीअंतर्गत पाइपलाइनचे काम सुरू आहे. ठेकेदार आणि कामगाराच्या निष्काळजीपणामुळे चौकातील रस्त्यास मोठे भगदाड पडले आहे.
An open drain on the road
An open drain on the roadesakal

Nashik News : सराफ बाजारातील जंगम बाजार चौकात स्मार्टसिटीअंतर्गत पाइपलाइनचे काम सुरू आहे. ठेकेदार आणि कामगाराच्या निष्काळजीपणामुळे चौकातील रस्त्यास मोठे भगदाड पडले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून भगदाड पडले आहे. स्मार्टसिटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने भगदाड आणि उघडा पडलेला नाला मृत्यूचा सापळा बनला आहे. (pothole on road is become death trap)

व्यावसायिक तसेच परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सर्वात मोठा आणि नेहमी प्रवाहित असलेला पुरातन सरस्वती नाला सराफ बाजारातून बालाजी कोटपर्यंत वाहत असतो. अतिशय खोल आणि धोकादायक असा नाला आहे. रस्त्याच्या खालून त्यास प्रवाहित करण्यात आले आहे.

या भव्य नाल्यावरील रस्त्यास सराफ बाजारातील जंगम बाजार चौकात भगदाड पडले आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना प्रकार घडला आहे. घटनेस १५ ते २० दिवस लोटले. अद्यापही नाल्याचा उघडा पडलेला भाग बंद करण्याच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. व्यवसायिकांची तर अडचण झालीच आहे.

परिसरातील नागरिकांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिका आणि स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी पडलेल्या भगदाडचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिक आणि नागरिकांकडून होत आहे. (Latest Marathi News)

An open drain on the road
Nashik NMC News : एकीकडे निवडणुका, दुसरीकडे खोदकाम; वैतागलेल्या नाशिककरांना दिलासा देण्यासाठी 15 मे ‘डेडलाईन’

व्यवसायावर परिणाम

भगदाडमुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. हातावर पोत गाठण्याचे काम करणारे जंगम व्यावसायिक तसेच भगदाडच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या सराफांच्या दुकानांकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. दैनंदिन नुकसान सहन करावे लागत आहे. अन्य व्यावसायिकांवरही काहीसा परिणाम झाला आहे.

सरस्वती नाल्यावर जाड लोखंडी अँगल टाकून त्यावर रस्ता तयार केला आहे. पडलेल्या भगदाडमुळे अँगल उघडा पडल्याने दुरवस्था उघड झाली आहे. पूर्ण अँगल सडून गेला आहे. भविष्यात अँगल कोसळून रस्ता खचण्याची शक्यता आहे.

"गेल्या १५ ते २० दिवसांपासून धोकादायक नाला असाच उघडा पडून आहे. कुणीही याकडे लक्ष देत नाही. व्यवसायावर परिणाम झाला आहेच. शिवाय भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महापालिका आणि स्मार्टसिटी अधिकाऱ्यांकडून लक्ष घालून त्वरित कामे पूर्ण करावी." - अनंता जंगम, व्यावसायिक

An open drain on the road
Nashik Water Shortage : टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अघोषित पाणीकपात; शहरात प्रतिनागरिक सव्वाशे लिटर पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com