नाशिक : कोरोनाच्या नावाखाली दांड्यांचा प्रघात

संसर्गाचे प्रमाणपत्र बघूनच रजा मंजुरीच्या सूचना
संसर्गाचे प्रमाणपत्र बघूनच रजा मंजुरीच्या सूचना
संसर्गाचे प्रमाणपत्र बघूनच रजा मंजुरीच्या सूचनाSakal

नाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना मनुष्यबळाची कमतरता महापालिकेला भासत आहे. परंतु, वेळेत पगार खात्यात जमा होत असल्याने महापालिकेची काळजी न वाहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या नावाखाली दांड्या मारण्याचा सपाटा लावला असून, त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच रजा मंजूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

‘क’ वर्गाचा दर्जा होता, त्या वेळी महापालिकेचा पहिला आकृतिबंध ७०९२ पदांचा होता. त्यानंतर महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्यानंतर नवीन आकृतिबंध १४ हजार ९२ पदांचा झाला आहे. दुप्पट अधिकारी, कर्मचारी संख्या वाढल्या असल्या तरी शासनाने अद्याप दुसऱ्या आकृतिबंधाला मंजुरी दिली नाही.

संसर्गाचे प्रमाणपत्र बघूनच रजा मंजुरीच्या सूचना
Video: U19 मधला 'जहीर खान', बांगलादेशची उडवली टॉप ऑर्डर

दरम्यान, पहिल्या आकृतिबंधातील तब्बल अडीच हजारांहून अधिक पदे विविध कारणांमुळे रिक्त झालेली आहे. रिक्त पदे आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने भरण्यास शासनाने पूर्णता नकार दिला आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला तरी आहे. त्याच मनुष्यबळामध्ये काम करावे लागत आहे. परिणामी एका कर्मचाऱ्यांना दोन ते तीन टेबलचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. कामाच्या ताणामुळे सुटी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कुठलेही कारण सांगून दांड्या मारण्याचा प्रघात महापालिकेत पडला आहे. त्यात कोरोनामुळे तर दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे फावले आहे. सर्दी, खोकला किंवा ताप असल्याचे कारण देत दांड्या मारण्याचे प्रमाण वाढले असून, दांड्यांमुळे महापालिकेचे कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com