
देवळा : भावडबारी घाट ते रामेश्वर फाटा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास तीन दिवसांपूर्वीच पोलिस बंदोबस्तात सुरवात झाली. मात्र, शुक्रवारी (ता. १६) शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ करीत काम बंद पाडले. यादरम्यान शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर दोन दिवसांत एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, मार्ग निघेपर्यंत काम बंद ठेवण्याबद्दल ठेकेदार व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. (Prakash Vinchur highway work stop again)