
नाशिक : सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) होण्याचे अनेकांचे स्वप्न असते व या स्वप्नपूर्तीसाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे स्वतःला झोकून देत अभ्यास करत असतात. काही पहिल्या प्रयत्नात, तर काही अनेक प्रयत्नांमध्ये यशस्वी होतात. तर अनेक विद्यार्थी अपयशामुळे नाद सोडतात. या सर्व बाबींना नाशिकचा प्रसन्नकुमार प्रफुल्ल सुराणा अपवाद ठरला असून, त्याने फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम या तिन्ही परीक्षा ऑल इंडिया रँकींग मिळविताना उत्तीर्ण झाला आहे.