
येवला : उत्सवप्रियता काय असते, त्याची व्याख्या येवल्यात आल्यावर कळेल इतकी वेगळे शैली प्रत्येक सणाला या नगरीने जपली आहे. त्यातच पतंग उत्सव म्हटला, की कर, मकरसंक्रांत आणि भोगी हे तीन दिवस जणू पैठणीचे शहर पतंगनगरी झालेले असते. या महाउत्सवासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत. या वेळी नायलॉन मांजावर कडक कारवाई सुरू असल्याने पारंपरिक सुतवून तयार केलेल्या मांजाला येवलेकरांनी यंदा प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मांजा सुतवण्याची एकच लगबग सुरू आहे.