
नाशिक : दोन वर्षांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या ‘क्रेडाई शेल्टर-२०२४’ प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवार (ता. २०) पासून २५ डिसेंबरपर्यंत नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना स्वप्नातील घरांचे स्वप्न एकाच छताखाली शोधता येणार आहे. शहरात ‘निमा इंडेक्स’नंतर सर्वांत मोठे भरणारे हे प्रदर्शन आहे. त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीसमोरील ठक्कर इस्टेट येथे प्रदर्शन होईल.