.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
NMC News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मलनिस्सारण (ड्रेनेज) संदर्भातील कामे मार्गी लावण्यासाठी काढलेल्या कामांवर अक्षरशः माजी नगरसेवकांच्या उड्या पडल्या आहे. सर्वच राजकीय पक्षांचे माजी नगरसेवकांनी ड्रेनेज कामांची ‘हंडी’ फोडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. यामुळे या दबावातून निविदा प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून नवीन नगरामध्ये त्याचप्रमाणे शहरातील विविध भागांमध्ये नवीन ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ( Pressure from 27 former counselor of all parties of Drainage work )