
पंचवटी : गेल्या दोन आठवड्यात जोरदार पावसामुळे शेतमाल खराब झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झळ बसली आहे. सद्यःस्थितीत पावसाची उघडीप सुरू असली तरी पालेभाज्या व फळभाज्यांची आवक घटली असून परिणामी बाजारभाव वधारले आहेत.
मंगळवारी (ता.३) झालेल्या लिलावात गावठी कोथिंबिरीला किमान तीस रुपये तर सर्वाधिक १९५ रुपये प्रति शेकडा, चायना कोथिंबिरीला किमान १५ रुपये तर सर्वाधिक दोनशे तीन रुपये प्रति शेकडा बाजारभाव मिळाला. ऐन सणासुदीच्या दिवसात पालभाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. (Prices of leafy vegetables increased during festive season due to decrease in arrivals)