
Nashik Vegetable Rate Fall : गेल्या दोन आठवडे पाऊस सुरू होता. मात्र, रविवारी (ता. ११) पावसाने विश्रांती घेताच फळभाज्या यांच्या आवकेत वाढ असून ती ६५ ते ७० टक्क्यांवर गेली आहे. तसेच पालेभाज्या आवकही स्थिर असून ५० ते ६० टक्के आहे. पावसामुळे बऱ्याच भिजलेल्या पालेभाज्या आवकदेखील अधिक आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला दिसून येत आहे. नाशिक बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. (Prices of vegetables fall due to break in rain)