Nashik Marriage Registration: सुरक्षेच्या दृष्टीने विवाह नोंदणीला प्राधान्य! पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत नोंदणीचा वाढला टक्का

Nashik News : मागील पाच वर्षांत पिंपळगाव ग्रामपंचायतीत विवाह नोंदणी करणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
Marriage Registration
Marriage Registrationesakal

पिंपळगाव बसवंत : लग्नानंतर आधारकार्ड, पासपोर्टसह विविध दस्ताऐवज तयार करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता व कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडता यावे, म्हणून विवाह नोंदणीला (Marriage Registration) नव्या जोडप्यांची प्राधान्य असल्याची बाब पुढे आली आहे. मागील पाच वर्षांत पिंपळगाव ग्रामपंचायतीत विवाह नोंदणी करणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विवाह नोंदणीला प्राधान्य दिले जात असून, टक्का वाढत आहे. (Nashik marriage registration in Pimpalgaon Baswant Gram Panchayat marathi news)

विवाह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस असतो. विवाहानंतर ग्रामपंचायतीत नोंदणीबाबत उदासीनता होती. मात्र, विवाहाचा कायदेशीर पुरावा, म्हणून नोंदणी प्रमाणपत्राला महत्त्व आहे. शिवाय पती-पत्नींचे संयुक्त बँक खाते, पासपोर्ट काढणे, विमा पॉलिसी, वारसाचा हक्क दावा, आंतरजातीय विवाह झाल्यास आदी शासकीय कामांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्‍यक असते.

मात्र, विवाह नोंदणीबाबत बहुतांश नवदांपत्य अनभिज्ञ असायचे. आता समाजातील अनपेक्षित घटनांपासून धडा घेत लग्नाच्या नोंदणीसाठी नागरिक पुढे येत आहेत. नोंदणीचा टक्का सातत्याने वाढत आहे. जन्म, मृत्यूच्या नोंदीप्रमाणेच आयुष्याची रेशमीगाठ बांधलेल्या जोडीदारासमवेत कायदेशीर दस्ताऐवज असावा, याबाबत जागरूकता वाढत आहे.

पिंपळगाव ग्रामपंचायतीत विवाह नोंदणीसाठी स्वंतत्र विभाग आहे. नवदांपत्यांचा संयुक्त अर्ज, लग्नपत्रिका, लग्नाचे फोटो, तीन साक्षीदार, पुरोहिताचे आधारकार्ड आदी दस्ताऐवज सादर करून तत्काळ विवाह नोंदणी दाखला दिला जात आहे.  (latest marathi news)

Marriage Registration
NMC News : नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीची 2 वर्षे; प्रशासक राज लांबले, काम थांबले!

पिंपळगांव ग्रामपंचायतीत विवाह नोंदणीची आकडेवारी

वर्ष व कंसात विवाह नोंदणी

सन २०२० (१५४)

२०२१ (२०३)

२०२२ (२१०)

२०२३ (२१६)

२०२४ : १० मार्चअखेर (६९)

"विवाह नोंदणी प्रमाणपत्र कायद्याच्या दृष्टीने अधिक बळकट मानले जाते. विविध शासकीय दस्ताऐवजासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. जन्म, मृत्यूच्या नोंदणीप्रमाणेच विवाहा नोंदणीलाही नागरिकांनी जागृकता दाखवावी."-भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

Marriage Registration
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी प्रथमच शहरात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com