.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्राथमिक मराठी विभागातून १२, खासगी प्राथमिक शाळांमधून पाच, माध्यमिक विभागातून एक, तर दोन विशेष शिक्षक पुरस्कार असे एकूण २० शिक्षकांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अनेक वर्षांपासून शिक्षक दिन झाल्यानंतर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिले जातात. मात्र अनेक वर्षांची विलंबाची प्रक्रिया खंडित होऊन शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने शिक्षक वर्ग समाधान व्यक्त केले जात आहे. (process of announcing outstanding teacher award of Municipal Corporation is broken)