Simhastha Kumbh Mela 2027esakal
नाशिक
Simhastha Kumbh Mela 2027: प्रयागराजच्या धर्तीवर ‘नाशिक महाकुंभ’ ला चालना द्या; राजाभाऊ वाजे यांची लोकसभेत पायाभूत सुविधांसंदर्भात मागणी
Latest Nashik News : पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून तेथे केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे अनेक पायाभूत कामांना चालना मिळाली आहे.
नाशिक : पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून तेथे केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यामुळे अनेक पायाभूत कामांना चालना मिळाली आहे. त्याच धर्तीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत केली. सन २०२७ सालात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून त्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन त्याचप्रमाणे अन्य शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तयारी सुरु आहे.