वाढावा पान मेन
----------------------------
31275
धुळे : अग्रसेन हॉलमधील नरेडको नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ ला भेट देणाऱ्या नागरिकांची गर्दी.
--
धुळ्यात एकाच छताखाली ३० हून अधिक गृहप्रकल्पांची माहिती
नरेडको प्रॉपर्टी एक्स्पोचा आज समारोप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : नाशिकमध्ये स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धुळेकर नागरिकांसाठी नरेडको नाशिक आयोजित नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. दोन ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या तीन दिवसीय एक्स्पोचा रविवारी (ता. ४) शेवटचा दिवस असून, नागरिकांनी धुळे शहरातील पांझरा नदीकाठच्या छत्रपती महाराज अग्रसेन हॉलमधील एक्स्पोला सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत भेट द्यावी, संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेडको नाशिकने केले आहे.
नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे सरासरी ३० स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. यामुळे नागरिकांना विविध बजेट, गरजा आणि पसंतीनुसार घरांचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. घर खरेदी, नवीन गृहप्रकल्प, गुंतवणूक तसेच नाशिकमधील आगामी विकासाच्या संधींबाबतची माहिती थेट बांधकाम व्यावसायिकांकडून घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे.
--------------
विकासाच्या नवसंधी
नाशिक हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. आगामी कुंभमेळा, वाढता औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील योगदान आणि येथील आल्हाददायक वातावरण यामुळे नाशिकमध्ये भविष्यात विकासाच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे धुळेकरांनी आपल्या गरजेनुसार योग्य घराची निवड करण्यासाठी रविवारी या एक्स्पोला भेट द्यावी. धुळे शहरात नाशिकमधील विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळत असल्याने, नागरिकांना प्रत्यक्ष नाशिकला जाण्यापूर्वी विविध प्रकल्पांची तुलना करण्याची आणि आपल्या बजेटनुसार घर निवडण्याची मोठी सोय झाली आहे.