Nashik Godavari : पाऊण कोटीत तपासणार गोदावरीचा फेस; ‘निरी’कडून महापालिकेला प्रस्ताव

Nashik Godavari : शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘निरी’ या संस्थेने महापालिकेकडे ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.
Godavari River
Godavari Riveresakal
Updated on

Nashik Godavari : गोदावरीसह उपनद्यांवर मोठ्या प्रमाणात फेस तयार होत असल्याने हा फेस नेमका कुठल्या कारणांनी तयार होतो, याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘निरी’ या संस्थेने महापालिकेकडे ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. गोदा प्रदूषणाचा गंभीर विषय असला तरी महापालिकेने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात २०१२ मध्ये गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. (proposal to Municipal Corporation from Nri to check of Godavari )

याचिकेची सुनावणी देताना निरी या संस्थेने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून या समितीने प्रदूषणासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन होत आहे किंवा नाही उपाययोजना केल्या जात असतील तर त्या कशाप्रकारे या संदर्भातील आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. निरी तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून मुख्यालयात गोदावरी संवर्धन कक्षाची निर्मिती करण्यात आली.

त्यासाठी स्वतंत्र उपायुक्त दर्जाच्या अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आला. सोमवारी (ता. २९) विभागीय आयुक्तांचे अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. त्या वेळी अशासकीय सदस्यांनी गोदावरी नदी तसेच उपनद्यांवर तयार होणारा फेस केमिकलयुक्त असल्याचा दावा केला. (latest marathi news)

Godavari River
Godavari River : जन्मदिनीही गोदावरीची अवहेलना

दरम्यान, यापूर्वीदेखील गोदावरी नदीवर फेस तयार होत असल्याने तो फेस नेमका कशापासून तयार होतो याचा अभ्यास करण्यासाठी निरी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली. संस्थेकडून महापालिकेला प्रस्ताव सादर करण्यात आला. गोदावरी व उपनद्यांवर तयार होणारा फेस कशामुळे तयार होतो याचे संशोधन करण्यासाठी ७५ लाख रुपयांची मागणी महापालिकेकडे करण्यात आली. त्याचबरोबर दोन वर्षाचा कालावधीदेखील मागण्यात आला. या संदर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.

‘एसटीपी’ चे सक्षमीकरण

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन नियमानुसार पाण्यातील बीओडी अर्थात ऑक्सिजनची पातळी तीसवरून दहा करण्यात आली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या मला जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. अमृत -२ योजना तसेच नमामि गोदा प्रकल्पात मल जलशुद्धीकरण प्रकल्पांचे सक्षमीकरणाचा प्रस्ताव आहे. सक्षमीकरण करण्यासाठी तेवढाच कालावधी लागणार असल्याने महापालिकेतून निरी या संस्थेला नकार कळविला जाणार आहे.

''गोदावरी व उपनद्यांवर निर्माण होणारा आहे फेस कोणत्या कारणाने तयार होतो, याचा अभ्यास करण्यासाठी निरी या संस्थेने महापालिकेकडे ७५ लाख रुपयांच्या प्रस्ताव दिला आहे.''-अजित निकत, गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख.

Godavari River
Nashik Godavari Aarti : पुरोहित संघास गोदाआरतीचा निधी देण्यास विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com