Nashik News : अंशकालीन स्त्री परिचर संघटनेकडून रास्ता रोको; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर निदर्शने

Nashik News : अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १) जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
The part-time women attendants association held a jail-wide protest blocking the road in front of the Zilla Parishad for various demands.
The part-time women attendants association held a jail-wide protest blocking the road in front of the Zilla Parishad for various demands.esakal
Updated on

नाशिक : राज्यातील आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांचे मानधनवाढ व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आयटकच्या महाराष्ट्र आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १) जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जेलभरो आंदोलनाचा इशारा दिलेला असल्याने पोलिसांनी आंदोलकांना या वेळी ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Protest at Zilla Parishad for pending demands of Women Attendant Association )

अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा फक्त तीन हजार रुपये मिळतात. १०० रुपये केंद्र सरकार व दोन हजार ९०० रुपये राज्य सरकार देत आहे. गेली ३५ वर्षे काम करणारे अंशकालीन स्त्री परिचर पूर्ण वेळ काम करतात. मात्र मोबदला अल्प दिला जातो. आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचरांना कर्मचारी दर्जा द्यावा, अर्धवेळचा २१ हजार रुपये मोबदला द्यावा, कायम करावे, वरील निर्णय आचारसंहितेपूर्वी त्वरित घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. राज्यभर १२ हजार अंशकालीन स्त्री परिचर कार्यरत असून, जिल्ह्यात एक हजार परिचर कार्यरत आहेत. (latest marathi news)

The part-time women attendants association held a jail-wide protest blocking the road in front of the Zilla Parishad for various demands.
Nashik News : प्रसंगावधानामुळे 3 मुलींच्या पित्याचा वाचला जीव; वाहतूक पोलिसांकडून समुपदेशन

शासनाने त्यासाठी सर्व मागण्यांबाबत तत्काळ बैठक बोलवावी, यात चर्चा करून प्रश्न मार्गी लावावेत, असे देसले यांनी सांगितले. आंदोलकांनी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केला. या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दुपारनंतर सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले. आंदोलनात, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा चित्रा जगताप, जिल्हा सचिव हसीना शेख, राजू निकम, संघटक प्राजक्ता कापडणे, बेबी सोळसे, सुनीता शेलार, मंगला जाधव, मीरा आहिरे, रागिणी डांगळे, रत्ना आहिरे, आशा पाटील, कविता सोनवणे, विमल निरगुडे, मंगला शेळके, वत्सला पगार, विणू दरोडे आदी सहभागी झाले होते.

The part-time women attendants association held a jail-wide protest blocking the road in front of the Zilla Parishad for various demands.
Nashik News : मालेगावचा उड्डाणपूल बनला वाहनतळ; बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची नवीन समस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com