PSI Success Story : वाखारीच्या शलाका शिरसाठची पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी!

Nashik News : शलाका शिरसाठ हिने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

Shalaka Shirsath, father Shri RN Shirsath, mother Sunita Nikam (Shirsath) and relatives expressing their happiness for achieving the post of police sub-inspector.
Shalaka Shirsath, father Shri RN Shirsath, mother Sunita Nikam (Shirsath) and relatives expressing their happiness for achieving the post of police sub-inspector. esakal

खामखेडा : आपल्या आई–वडिलांचे स्वप्न असते की, कुटुंबातील एकजण तरी सरकारी अधिकारी व्हावे. असेच स्वप्न शलाकाच्या आई–वडिलांनी बाळगले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शलाकाने देखील प्रचंड मेहनत घेतली. देवळा तालुक्यातील वाखारी येथील व देवळा एज्युकेशन संस्थेतील उच्च माध्यमिक शिक्षक(सेवानिवृत्त) आर एन शिरसाठ व माध्यमिक शिक्षिका सुनिता निकम यांची कन्या शलाका शिरसाठ हिने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Nashik PSI Success Story Shalaka Shirsath of Wakhari news)

शलाकाचे प्राथमिक शिक्षण शारदादेवी व माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे शालांत परीक्षेत ९४ % गुण मिळवून पूर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात झाले. बारावीनंतर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या वडगाव पुणे (मॅकेनिकल) शाखेत प्रवेश घेतला.

बीईच्या आठही सेमिस्टर मध्ये विशेष प्राविण्यासह पदवी मिळवल्यानंतर शलाकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले. शलाका लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला.

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असली तरी रचनात्मक सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, मेहनत ही त्रिसूत्री हमखास यशाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात घेऊन अभ्यास केला. तिने स्वयं अध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवले. शलाकाला पुणे येथील ज्ञानदीप अकॅडमी संस्थेचे विशेष मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ साठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पद संपादित केले. तिच्या या यशामुळे आईवडिलांचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याची भावना आई वडीलांनी व्यक्त केली.  (latest marathi news)


Shalaka Shirsath, father Shri RN Shirsath, mother Sunita Nikam (Shirsath) and relatives expressing their happiness for achieving the post of police sub-inspector.
Success Story : जिद्दीच्या जोरावर सोनाली बनली अभियांत्रिकी सहाय्यक! सरळसेवा भरतीतून निवड

तिच्या यशाबद्दल देवळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ हितेंद्र आहेर, मविप्रचे माजी संचालक डॉ व्ही एम निकम, विजय पगार, जितेंद्र आण्णा आहेर, योगेश आबा आहेर, देवळा एज्युकेशन संस्थेच्या सचिव डॉ मालती आहेर, डॉ वसंत आहेर, पीनू दादा आहेर, प्रशासकीय अधिकारी प्रा. बी के रौंदळ, डॉ सतिश ठाकरे, डॉ डी के आहेर, पोपट सागर, श्रीराम काळे, डॉ अशोक सोनवणे, दिलीप आहेर, अरुण पवार, डी आर अहिरे, बाबूलाल पवार, देवळा रोटरी क्लबचे अध्यक्ष एस टी पाटील, भाऊसाहेब मगर, संजय भामरे, एस टी शिरसाठ, शशिकांत निकम, अशोक मगर, जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सागर आदींनी अभिनंदन केले.

"आई वडील दोघेही शिक्षक असल्याने माझ्या शिक्षणासाठी नेहमीच त्यांनी मोकळीक दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठलेही दडपण नव्हते.या यशात सर्व स्तरावर लाभलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. एवढ्यावर न थांबता पुढील पदासाठीच्या परीक्षांची तयारी करायची आहे." - शलाका शिरसाठ


Shalaka Shirsath, father Shri RN Shirsath, mother Sunita Nikam (Shirsath) and relatives expressing their happiness for achieving the post of police sub-inspector.
Success story : नांदूरमधील तरुण विकास अधिकारी होऊनच परतला, वडिलांच्या स्वप्नाला कष्टाची झालर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com