
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागात गृहभेटींद्वारे कुटुंबापर्यंत पोहोचवून मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय ग्रामीण भागात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संनियंत्रणाखाली शहरी व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Public awareness about voting is being done through home visits and information of assembly election )