पान-३ साठी
-----------
३०-२
उड्डाणपुलाच्या कठड्याला
पीकअप धडकून चार ठार
-------------
सिन्नरजवळ गोंदे शिवारातील घटना
----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१८ ः नाशिक- पुणे महामार्गावर गोंदे शिवारात मजूर असलेली पिकअप पुलाच्या कठड्याला धडकून चार परप्रांतीय मजूर ठार झाले. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (ता.१७) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडली. मृतांत तीन पश्चिम बंगाल तर एक बिहारचा मजुर आहे.
पुणे महामार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. रात्री उशीरा हे काम संपून पिकअपने (एमएच १४ केक्यू २३६१) मजूर घरी जात होते. गोंदे शिवारात उड्डाणपुलावर असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यात तीन मजूर पुलावरुन खाली पडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले.
साजेमन अली साजीबूर रहमान (२१), एम. डी. बिसू आसामुद्दीन (२५ दोघे रा. तलसूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल), खुर्शीद अलीम अब्दुल रहीम (१९, रा. आमडोल घाट, जि. मालदा, पश्चिम बंगाल), अब्दुल महंमद हुसेन कलाम (२२, रा. गाजपाडा, ता. लोहडांगा, जि. किशनगंज, विहार) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. साजिद आलम (१९), समीर हुसेन (२०), तुहीत आलम (१९), महेबुवा आलम (२३) आयाब अली (२०) गंभीर जखमी आहेत.
-----------------