
नाशिक : बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या नविन प्रकल्प आराखड्याला अद्यापही मुहुर्त लागलेला नाही. खुद्द रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पात लक्ष घातले असतानाही प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील भू-संपादनाची प्रक्रीया थंड बस्त्यात आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक व पुणे या दोन शहरांमध्ये सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. २३५ किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे दोन्ही शहरातील प्रवासाचा कालावधी अवघ्या अडीच तासांवर येणार आहे.