.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक रोड : शिंदेगाव येथील नायगाव रोडवर औद्योगिक वसाहतीत मालवाहू मालट्रकला आग लागून ही आग एका फटाके गोडाऊनला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १०) घडली. आगीत फटाक्यांचे गोडाऊन व मालट्रक जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले. तब्बल पाच तासानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तमिळनाडू येथील कर्मराज व सतीश कुमार हे दोघे जखमी झाले आहेत. त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.