नाशिक- येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत यजमान नाशिक संघाने चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धेतील दोनदिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने नंदुरबारवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले. एकूण पाच साखळी सामन्यांत उत्तम सांघिक कामगिरीने सहा संघांच्या आय गटात पहिला क्रमांक मिळवत गटविजेतेपदासह पुढच्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.