Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: रोड शो मार्गावर पोलिसांचा रुटमार्च! पोलिसांचा फौजफाटा तैनात

Nashik News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या (ता. १४) दुपारी नाशिकमध्ये पोहोचत आहे.
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi Bharat Jodo Yatraesakal

नाशिक : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या (ता. १४) दुपारी नाशिकमध्ये पोहोचत आहे. द्वारका सर्कल ते शालिमार मार्गे त्र्यंबक नाका असा रोड शो होणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी रोड-शोच्या मार्गावर रुट मार्च केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाट्यासह रंगीत तालीमच पोलिसांनी केली. (Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Yatra marathi news)

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी (ता. १३) नाशिक जिल्ह्यात दाखल झाली असून, गुरुवारी (ता.१४) दुपारी नाशिक शहरातील द्वारका चौकात दाखल होईल. त्यानंतर द्वारका चौक, सारडा सर्कल, खडकाळी सिग्नल, शालिमार चौक, सीबीएस चौकातून त्र्यंबक नाकापर्यंत राहुल गांधी यांचा रोड शो असणार आहे.

या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून बुधवारी (ता. १३) सायंकाळी द्वारका ते शालिमार मार्गे त्र्यंबकनाका अशी रंगीत तालिमच पोलिसांनी घेतली.  (latest marathi news)

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
BJP Loksabha Second List: भाजपचा गेम प्लॅन! राज्यात 4 खासदारांचा पत्ता कट; कुणाला मिळाली पहिल्यांदा संधी? जाणून घ्या

शहर गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहायक आयुक्त नितीन जाधव, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह भद्रकाली, पंचवटी, मुंबई नाका, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक यात रुटमार्चमध्ये सामील झाले. यावेळी रोड-शो मार्गावरील अडथळे, बॅरिकेटींग, फिक्स पॉईंटबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या.

चौकांना झेंडे, फलकबाजी

द्वारका चौक ते शालिमार मार्गे त्र्यंबक नाकापर्यंतच्या रस्त्यावर खासदार राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांचे झेंडे, बॅनर उभारण्यात आलेले आहेत. द्वारका सर्कल, सारडा सर्कल, शालिमार चौक हे परिसर काँग्रेसमय झाले आहे. 

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
BJP Candidate 2nd List Loksabha 2024: भाजपच्या ७२ उमेदवारांची घोषणा! कोणत्या राज्यात कुणाला मिळालं तिकीट? संपूर्ण माहिती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com