नाशिक : रेल्वेची आरक्षण मर्यादा संपली; प्रवाशांचे हाल

आरक्षण मिळत नाहीत, जनरल तिकीट मिळत नाहीत त्यामुळे भाउबीज निमित्त माहेरी जाणारा महिलांचे व लहान मुलाचे होणार हाल.
Indian Railways
Indian Railwaysesakal

नाशिक रोड : दिवाळीत गोदावरी, भुसावळ -पुणे, भुसावळ मुबंई पॅसेंजर बंद, दोन तीन तासाचा प्रवाशासाठी आरक्षण मिळत नाहीत, जनरल तिकीट मिळत नाहीत त्यामुळे भाउबीज निमित्त माहेरी जाणारा महिलांचे व लहान मुलाचे होणार हाल. खाजगी वाहतुकीसाठी प्रवाशाचा अतिरिक्त भुर्दड सोसावा लागणार, वाढत्या गर्दी्मुळे सोसल डिस्टन्सिंग उडणार फज्जा. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता. आरक्षण मिळत नाही जनरल तिकीट मिळत नाहीत त्यामुळे आई जेवू घालीना बाप भिक मागून दे ना आशी आवस्था प्रवाशांची झाली आहेत.

मध्ये रेल्वे मागार्वरील बाहेर राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु झाल्या आसल्या तरी मुबंई ला जाण्यासाठी व येण्यासाठी मनमाड- पंचवटी व राज्यराणी सुरु केली आसली तरी गोदावरी, भुसावळ -पुणे, भुसावळ-मुबंई पॅसेंजर या गाडया सुरु होण्याची प्रतिक्षा आहे. मुंबईं - भुसावळ पर्यत् लहान मोठ्या स्थानकावर दिवाळी दरम्यात गर्दी आसते या गाड्यानी ग्रामीण भागात जाण्यास नागरिकांना सोयीचे होते तसेच पॅसेजर मुळे इगतपुरी, घोटी, अस्वली, लहवित, देवळलीकॅम्प, नाशिकरोड, ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे, निफाड, उगाव, सिंमेट आदि लहान स्थानकावर जाण्यास सोयीचे होत होते.

Indian Railways
सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांचे निधन

तसेच मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ या एक ते तीन तासाच्या प्रवाशासाठी आरक्षण मिळत नाहीत, जनरल तिकीट सुरु नाहीत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे बाहेर राज्यात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात आलेला आहेत त्या गाड्यांना आरक्षण कोठा पुर्ण झाला आहेत. तसेच प्रतिक्षा सुचीला मर्यादा ती संपली आहेत. एक ते तीन तासासाठी प्रवास करणारे प्रवाशी आरक्षण काढण्यात गेलेतर एक दिड तास रांगत उभे राहुनही त्यांना आरक्षण मिळत नाहीत

गोदावरी, राज्यराणी , भुसावळ -पुणे, भुसावळ-मुबंई पॅसेंजर या गाड्या बंदमुळे माहेरी जाण्यासाठी महिलांना खासगी वाहने दुचाकी वाहनाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यात वेळ आणि पैसा अतिरिक्त खर्च् होणार आहेत. तसेच माहेरी जातांना महिला समवेत लहान मुले आसतता त्यांना यामुळे धोका निर्माण् होण्याची शक्यात आहे. तसेच खाजगी वाहनांत मर्यादा् पेक्षा् जादा सिट भरले जातात व प्रवास सुरक्षित होईल य़ांची गॅरेटी नाही.

दिवाळीमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी पाहता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई येथून गोरखपूर, दानापूर व बनारस येथे जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने प्रवाशांची सोय होईल. मात्र, त्यातून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांना प्रवास करता येईल.

अशा धावणार विशेष गाड्या

101263 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ता. 6 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. तर 01264 विशेष गोरखपूर येथून 8 नोव्हेंबर सकाळी 8.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा येथे थांबणार आहे.

Indian Railways
नाशिक : तुषार भोसले यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडवणीसांची सरप्राईज भेट

01270 विशेष 6 नोव्हेंबरला पहाटे पाचला दानापूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.15 वाजता एलटीटी येथे येईल. कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा येथे थांबा आहे.

01273 विशेष एलटीटी येथून 5 नोव्हेंबरला रात्री 11.05 वाजता सुटून ता. 7 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजता दानापूरला पोहोचेल. 01274 विशेष ता. 7 नोव्हेंबरला पहाटे पाचला दानापूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.15 वाजता एलटीटीला येईल. या गाडीला कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर असे थांबे आहेत.

एलटीटी-बनारस विशेष गाडी

01279 विशेष एलटीटी येथून ता. 6 नोव्हेंबरला सकाळी 11.15 वाजता सुटून बनारस येथे ता. 7 नोव्हेंबरला दुपारी 1.25 वाजता पोहोचेल.

तसेच 01280 विशेष बनारस येथून ता 7 नोव्हेंबरला दुपारी 3.40 वाजता सुटून एलटीटीला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, ज्ञानपूर रोड येथे थांबणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com