Nashik Railway Junction : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला जोडण्यासाठी रस्त्यांपेक्षा जास्त रेल्वेची जोडणी महत्त्वपूर्ण ठरेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून होणारी वाहतूक ही नाशिकमार्गे होईल. यादृष्टीने नाशिक भविष्यातील रेल्वे जंक्शन होईल. सद्यःस्थितीला पुणे-नाशिक-सुरत या मार्गाची चाचपणी सुरू आहे, तर नाशिक ते डहाणू मार्गाच्या सर्वेक्षणास नुकतीच मंजुरी मिळाली. (nashik Railway Junction in future)